महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल २०२० : जसप्रीत बुमराहकडे 'पर्पल कॅप' - purple cap in ipl 2020

बुमराहच्या खात्यात आता १३ सामन्यांत २३ विकेट्स आहेत. रबाडाकडेही २३ विकेट्स आहेत, परंतू चांगल्या सरासरीमुळे बुमराहने विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. या पर्पल कॅपबद्दल फारशी चिंता नसल्याचे बुमराहने सांगितले.

mumbai pacer jasprit bumrah snatches purple cap from kagiso rabada in ipl 2020
आयपीएल २०२० : जसप्रीत बुमराहकडे 'पर्पल कॅप'

By

Published : Nov 1, 2020, 3:01 PM IST

नवी दिल्ली - मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडून 'पर्पल कॅप' आपल्याकडे घेतली आहे. दिल्ली कॅपिल्सविरुद्ध आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात बुमराहने १७ धावा देत ३ फलंदाजांना तंबूत धाडले. या कामगिरीमुळे तो लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

बुमराहच्या खात्यात आता १३ सामन्यांत २३ विकेट्स आहेत. रबाडाकडेही २३ विकेट्स आहेत, परंतू चांगल्या सरासरीमुळे बुमराहने विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे. या पर्पल कॅपबद्दल फारशी चिंता नसल्याचे बुमराहने सांगितले.

बुमराह म्हणाला, "मला जे करायचे होते ते करण्याचा मी प्रयत्न करत होतो. पर्पल कॅपबद्दल फारशी चिंता नव्हती. संघाचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. २० षटकांत मी कधीही गोलंदाजी करण्यास सज्ज आहे. मला हे चॅलेंज आवडते.''

ABOUT THE AUTHOR

...view details