महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सची पराभवाची परंपरा कायम, २०१३ पासून जिंकता आलेला नाही सलामीचा सामना - Against

मुंबई सलामीच्या सामन्यात सलग सातव्यांदा पराभूत

Mumbai

By

Published : Mar 25, 2019, 1:56 PM IST

मुंबई -वानखेडे मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ३७ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबईला आयपीएलमध्ये सलामीच्या सामन्यात पराभवाची मालिका खंडित करता आली नाही.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला २०१३ पासून एकदाही सलामीचा सामना जिंकता आलेला नाहीय. या स्पर्धेत मुंबईने 2013 पासून सलग सातव्यांदा पराभवाने सुरुवात केली आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रिषभ पंतच्या ७८ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २१३ धावा उभारल्या. दिल्लीने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला १९.२ षटकात १७६ धावा करता आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details