मुंबई- प्ले ऑफच्या रेसमध्ये असलेल्या कोलकात्याचा सामना रविवारी मुंबई विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी कोलकात्याचा संघ मुंबई विरुद्ध सर्वेश्रेष्ठ प्रदर्शन करेल. दुसरीकडे मुंबईचा संघ विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
मुंबईने आजचा सामना जिंकला तर त्यांचे १८ गुण होतील आणि नेट रन रेट नुसार पहिले स्थान काबिज केल्यास मुंबईला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दोन संधी मिळतील. मागील सामन्यात कोलकात्याने मुंबईचा ३४ धावांनी पराभव केला होता. मुंबईला या पराभवाची परतफेढ करण्याची संधी आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यावरुन मुंबई कोणत्या स्थानावर राहणार तसेच प्ले ऑफमध्ये त्यांचा विरोधी संघ कोणता असणार हे समजून येईल.