मुंबई - आयपीएलमध्ये बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर थरारक विजय मिळवला. या विजयासह मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाबला मागे सारत तिसरे स्थान पटकावले आहे.
IPL : पंजाबवर थरारक विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत मुंबई 'या' स्थानी - Indian Premier League
पोलार्डच्या ३१ चेंडूत ८३ धावाच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाबवर मिळवला धमाकेदार विजय
पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघाच्या खात्यात ८ गुण मात्र रनरेटमध्ये सरस ठरल्याने मुंबईच्या संघाला तिसरे तर पंजाबला चौथे स्थान देण्यात आले आहे. गुणतालिकेत धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने १० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही विजय मिळवू न शकलेला कोहलीचा बंगळुरू संघ शून्य गुणासह सर्वात शेवटी आठव्या स्थानी आहे.
वानखेडे मैदानावर काल खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार पोलार्डच्या ३१ चेंडूत ८३ धावाच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने धमाकेदार विजय मिळवला.