महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिल्ली कॅपिटल्सवरील विजयानंतर गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची दुसऱ्या स्थानी झेप - points table

विराट कोहलीचा बंगळुरू संघ २ गुणासह आठव्या स्थानी आहे

मुंबई इंडियन्सची दुसऱ्या स्थानी झेप

By

Published : Apr 19, 2019, 2:43 PM IST

मुंबई - आयपीएलच्या बाराव्या मोसमात गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर संघावर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीला मागे सारत दुसरे स्थान पटकावले आहे. तर दिल्लीला एका स्थानाचे नुकसान झाले असून ते तिसऱ्या स्थानी आले आहेत.


धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला आपल्या मागच्या सामन्यात हैदराबादकडून पराभवाचा धक्का बसला होता. तरीही चेन्नईने १४ गुणांसह गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर कालत्या विजयामुळे मुंबईच्या संघाला २ गुणांचा फायदा झाला असून ते १२ गुणांसह द्वितीय स्थानी आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघाच्या खात्यात १० गुण आहेत, मात्र रनरेटमध्ये सरस ठरल्याने दिल्लीच्या संघाला तिसरे तर पंजाबला चौथे स्थान देण्यात आले आहे.

गुणतालिका


उरलेल्या ४ संघामध्ये ८ गुणासंह हैदराबाद पाचव्या, कोलकाता सहाव्या, तर राजस्थान सातव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये एकच विजय मिळवू शकलेला विराट कोहलीचा बंगळुरू संघ २ गुणासह सर्वात शेवटी म्हणजेच आठव्या स्थानी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details