महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी खुशखबर! लसिथ मलिंगा आयपीएलचे सर्व सामने खेळणार - mumbai indians

मलिंगास परवानगी दिली नसती तर तो सुरुवातीच्या सहा सामन्यास मुकला असता.

लसिथ मलिंगा

By

Published : Mar 26, 2019, 9:33 PM IST

कोलंबो - मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्व सामन्यात खेळण्याची परवानगी दिली.

मलिंगाने श्रीलंकेत होणाऱया विश्वचषकाच्या तयारीसाठी स्थानिक सामन्यात खेळण्यासाठी आयपीएल सोडून मायदेशी जाणार होता. बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला लसिथ मलिंगास आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी मंजुरी दिली.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामुळे मलिंगाचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मलिंगास परवानगी दिली नसती तर तो सुरुवातीच्या सहा सामन्यास मुकला असता. त्याच्या परतण्याने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी अधिक मजबूत होणार आहे. मुंबईचा दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्याच सामन्यात पराभव केला होता. या सामन्यात मलिंगा खेळला नव्हता.

ABOUT THE AUTHOR

...view details