हैदराबाद - आयपीएलमध्ये सोमवारी खेळल्या गेलेल्या हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील सामन्यात हैदराबादच्या संघाने ४५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादच्या संघाने प्लेऑफमधील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या ८१ धावांच्या जोरावर पंजाबसमोर २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
पंजाबचा गोलंदाज मुजीब ऊर रहमानने हैदराबादविरुद्ध केला 'हा' लाजिरवाणा विक्रम - IPL
आयपीएलच्या बाराव्या सत्रात मुजीब-उर-रहमान एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरलाय
या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी पंजाबचा गोलंदाज मुजीब ऊर रहमानचा चांगलाच समाचार घेतला. रहमानने टाकलेल्या ४ षटकांमध्ये तब्बल ६६ धावा देत आयपीएलच्या या सत्रातील एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या बाराव्या सत्रात मुजीब-उर-रहमान एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. या ४ षटकांमध्ये त्याने तब्बल ७ चेंडू वाईड टाकले. मुजीबव्यतिरिक्त टिम साऊथी सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांमधे दुसरा असून त्याने केकेआरविरुद्ध ६१ धावा दिल्या होत्या. तर या यादीमध्ये भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आरसीबीविरुद्ध गोलंदाजी करताना ५९ धावा दिल्या होत्या.