मुंबई- फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आत्याधुनिक राफेल विमाने भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. अंबाला येथील भारतीय वायुसेनेच्या स्टेशनमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, वायु दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या उपस्थितीत पाच विमाने आज भारताच्या 17 स्क्वॉड्रॉनच्या 'गोल्डन एरोस'मध्ये समाविष्ट करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वायुसेनेचे अभिनंदन केले आहे.
धोनीने या संदर्भात दोन ट्विट केले आहेत. त्यात तो म्हणतो की, जगातील सर्वोत्तम 4.5 जनरेशनच्या लडाखू विमानांना जगातील बेस्ट पायलट मिळाले. राफेलमुळे भारतीय वायु सेनेचे घातक शक्ती वाढेल.
17 स्क्वॉड्रॉनला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांसाठी राफेल मिरज 2000 च्या सर्व्हिस रेकॉर्डवर मात करेल, अशी आशा आहे. परंतु सुखोई 30 एमकेआय हे माझे आवडते राहिल. सुपर सुखोईमध्ये अपग्रेड होईपर्यंत मुलांना डगफाइट करण्यासाठी नवीन लक्ष्य मिळतील, असेही धोनी म्हणाला.