महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रिकेटपासून दुरावलेला धोनी आता करणार समालोचन?

भारत आणि बांगलादेश या संघांदरम्यान २२-२६ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाताच्या ईडन गार्डनवर दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

क्रिकेटपासून दुरावलेला धोनी आता करणार 'हे' काम

By

Published : Nov 6, 2019, 6:15 PM IST

नवी दिल्ली- भारतीय संघ बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. या दोन्ही संघात सध्या टी-२० मालिका सुरू असून बांगलादेशने पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी विश्वचषकानंतर क्रिकेटपासून लांब राहिला होता. मात्र, तो आता याच मालिकेतून चाहत्यांना भेटीस येणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा -चीन ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाही सलामीलाच पराभूत; पारपल्ली, प्रणित विजयी

भारत आणि बांगलादेश या संघांदरम्यान २२-२६ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाताच्या ईडन गार्डनवर दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

काही मीडियासंस्थांच्या वृत्तानुसार, क्रीडा प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्ट्सने भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी भारताच्या सर्व माजी कर्णधारांना बोलवण्याच्या योजनेसंबंधी सौरव गांगुलीशी संपर्क साधला आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात माजी कर्णधार समालोचन करताना दिसणार आहेत. धोनीने हे समालोचनाचे आमंत्रण स्वीकारले तर, त्याला पहिल्यांदाच समालोचन करताना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details