नवी दिल्ली - २०११मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडरक स्पर्धा जिंकून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे मोठे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर भोजपुरी अभिनेता आणि खासदार मनोज तिवारी यांनी आपल्या गावात घराजवळ सचिन तेंडुलकरची मुर्ती बनवली होती. तसेच तिथे मंदिर बांधण्याचीही चर्चा होती. आता खासदार झाल्यानंतर मनोज तिवारी यांनी आपल्या गावात अतरवालिया येथे एक मोठे स्टेडियम उभारण्यासंबधी वक्तव्य केले आहे. हे स्टेडियम सचिनच्या नावावर असेल.
हेही वाचा -योगराज सिंग पुन्हा चर्चेत...दिग्दर्शकाने केली चित्रपटातून हकालपट्टी
मनोज तिवारी यांचे स्वप्न -
दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक कामातून कैमूरला आले होते. लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, माझे स्वत:चे गाव अतरवालिया येथे स्टेडियम असण्याचे माझे स्वप्न आहे. जेणेकरून येथे राष्ट्रीय सामना खेळला जाऊ शकेल आणि खेड्यातील तरूणांना संधी मिळेल.
''आम्ही स्टेडियमच्या मैदानासाठी जमिन शोधत आहोत. पण सापडत नाहीये. येथे, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर खूप प्रेम आहे. आम्हाला कोणालाही भाग पाडण्याची इच्छा नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांशी यासंबंधी बोलत आहोत. मी वचन देतो की, पुढील वर्षात हे स्वप्न प्रत्यक्षात येईल. मी शपथ घेतो, आई मुंडेश्वरी आई विंध्यवासिनी नक्कीच माझे स्वप्न पूर्ण करेल'', असे मनोज तिवारी यांनी सांगितले. २०१३मध्ये मनोज तिवारी यांनी सचिन तेंडुलकरची मुर्ती बांधली होती.