मुंबई- पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीजने, आपले जगातील ५ सर्वश्रेष्ठ फलंदाज निवडले आहेत. हाफिजच्या या यादीत सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली याचाही समावेश आहे.
सद्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडाविश्व ठप्प पडले असून, कुठेही कोणतीही स्पर्धा सुरू नाही. पण खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. मोहम्मद हाफिजने आपल्या चाहत्याशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला. तेव्हा एका चाहत्याने त्याला, तुझे जगातील सर्वश्रेष्ठ पाच फलंदाज कोण आहेत? असा सवाल केला.
यावर हाफिजने उत्तर देताना सांगितले की, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सईद अन्वर आणि एबी डिव्हिलियर्स हे माझे सर्वश्रेष्ठ फलंदाज आहेत.