मुंबई- वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने ऑफस्पिनर मोईन अलीला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज सॅम कर्रनची संघात निवड करण्यात आली आहे.
WI VS ENG T-20: मोईन अलीला विश्रांती, सॅम कर्रनची संघात निवड - आयपीएल
इंग्लंडने ऑफस्पिनर मोईन अलीला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज सॅम कर्रनची संघात निवड करण्यात आली आहे.
विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा पाचवा सामना खेळून मोईन अली माघारी परतणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी मोईन अलीला विश्रांती देण्यात आली आहे. मोईन अली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो. याआधीही बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांना आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. स्टोक्स आणि बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतात.
सॅम कर्रनही आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन संघाकडून खेळणार आहे. परंतु, सॅम कर्रन विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात नव्हता. सॅम कर्रनने गेल्यावर्षी भारताविरुद्ध कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. इंग्लंडचा विंडीजविरुद्धचा शेवटचा टी-ट्वेन्टी सामना १० मार्चला असून आयपीएल स्पर्धा २३ मार्चला सुरू होणार आहे.