मुंबई - भारताच्या एकदिवसीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वकरंडकासाठी भारतीय क्रिकेट संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार असून भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जूनला होणार आहे.
मिताली राज म्हणते, विश्वकरंडक स्पर्धेत 'हा' संघ असेल विजेतेपदाचा प्रबळ दावेदार
भारतीय संघाकडे असलेले गोलंदाज आणि फंलदाज हे अनुभवी आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारताकडे विश्वकरंडक जिंकण्याची संधी असणार आहे
मिताली राज
मिताली म्हणाली की, 'भारतीय संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत, जे भारताला कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटवू शकतात. विराट कोहलीच्या नेतृत्वात रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमरा यांसारखे खेळाडू भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून देण्यात सक्षम आहेत. भारतीय संघाकडे असलेले गोलंदाज आणि फंलदाज हे अनुभवी आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारताकडे विश्वकरंडक जिंकण्याची संधी असणार आहे.'
विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.