महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारापेक्षा विराट कोहलीच 'सर्वोत्तम'

विराट कोहली एकदिवसयीय  क्रिकेटमध्ये सचिन आणि लारापेक्षाही  सर्वोत्तम फलंदाज

virat

By

Published : Mar 9, 2019, 8:04 PM IST

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसयीय मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सलग शतक झळकावणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीवर सर्व क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी तर, विराट कोहलीला एकदिवसयीय क्रिकेटमध्ये सचिन आणि लारापेक्षाही सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे.



एका क्रिकेट चाहत्याने मायकल यांना एक ट्वीट करत विचारले होते की, विराट हा सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहे, असे तुझे मत आहे का ? यावर त्या चाहत्याला उत्तर देताना मायकल वॉन यांनी विराटला वनडेमध्ये सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम असल्याचे सांगितले.

गेल्या काही वर्षात भारताचा कर्णधार विराट हा सध्या आपल्या नावाप्रमाणे 'विराट' कामगिरी करत आहे. सध्याच्या आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी दमदार होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details