महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जर भारत हुशार असेल तर विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला विश्रांती देईल - 2019

विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेपूर्वी विराटने स्वत:ला वेळ द्यायला हवा

विराट कोहली

By

Published : Apr 8, 2019, 5:20 PM IST

मुंबई - आयपीएलमध्ये रविवारी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग सहाव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पार्श्‍वभुमीवर इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माईकल वॉन यांनी विराट कोहलीला विश्वचषकापूर्वी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत वॉनने आपले म्हणणे मांडले आहे.


मायकलने आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे, की 'जर भारत हुशार असला तर आगामी आयसीसी विश्वचषकापूर्वी विराटला विश्रांती देईल. विश्वचषकासारख्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी विराटने स्वत:ला वेळ दिला पाहिजे.'

माईकल वॉन


सलग सहा सामन्यात झालेल्या पराभवामुळे आरसीबीने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या एका लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरीही साधली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने २०१३ साली सलग सहा सामने हारण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला होता.


ग्रुप स्टेजमध्ये आरसीबीचे फक्त ८ सामने बाकी असून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता त्यांना प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे. आतापर्यंत आयपीएलच्या बाराव्या मोसमात आरसीबीच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाहीय.

ABOUT THE AUTHOR

...view details