महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताकडे अजुनही वेळ आहे, ते पंतचा विश्वचषकासाठी संघात समावेश करु शकतात - मायकल वॉन - world cup squad

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी दिल्लीसाठी २१ चेंडूत ४९ धावा केल्या होत्या.

ऋषभ पंत

By

Published : May 9, 2019, 11:51 PM IST

Updated : May 10, 2019, 12:03 AM IST

मुंबई - इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन क्रिकेटबद्दल सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असतो. नुकतेच त्याने एक ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, 'भारताने विश्वचषकासाठीच्या संघात ऋषभ पंतला स्थान का दिले नाही, भारताकडे अजुनही चांगली वेळ आहे, ते पंतचा विश्वचषकासाठीच्या संघात समावेश करु शकतात.'

मायकल वॉन

पंतची विश्वचषकासाठी संघात निवड न होणे, हे नक्कीच निराशाजनक आहे. मात्र भारताकडे अजुनही आपली चुक सुधारण्याची संधी असे मायकल म्हणाला. बुधवारी खेळल्या गेलेल्या दिल्ली आणि हैदराबादच्या एलिमिनेटर सामन्यात ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी दिल्लीसाठी २१ चेंडूत ४९ धावा करत विजय मिळवून दिला होता. या विजयामुळे दिल्लीच्या संघाने आयपीएलमध्ये विजेतेपदासाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे.


मायकलच्याआधी, अनेक दिग्गज खेळाडूंनीही ऋषभ पंत भारताच्याच विश्वचषक संघात हवा असल्याची भूमिका घेतली होती.

Last Updated : May 10, 2019, 12:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details