मुंबई- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्लात हुतात्मा झालेल्या जवानांप्रती आदर दाखवण्यासाठी भारतीय संघाने विशेष आर्मी कॅप्स परिधान केल्या होत्या. भारतीय खेळाडूंनी जवानांप्रती दाखवलेल्या या आदराबद्दल इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाने सैनिकांबद्दल दाखवलेल्या आदराबद्दल मायकेल वॉनने केले कौतुक - ऑस्ट्रेलिया
भारतीय खेळाडूंनी जवानांप्रती दाखवलेल्या या आदराबद्दल इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नाणेफेकीच्या वेळी स्पेशल आर्मीची कॅप घालून आला होता. महेंद्रसिंह धोनीने सामन्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडूंसह व्यवस्थापनातील सदस्यांनादेखील ह्या कॅप्स दिल्या होत्या. याबरोबरच तिसऱ्या सामन्यांचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा दलला दिले होते. हा निधी हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. भारतीय संघाच्या सैनिकाबद्दलच्या या आदराबद्दल मायकेल वॉनने ट्वीट करत भारतीय संघाचे कौतुक केले.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. यानंतर, भारत-पाकिस्तानातील वातावरण चिघळले होते. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करताना एमएफएनचा दर्जीदेखील काढून घेतला होता.