बार्बाडोस - इंग्लंडच्या संघाला विश्वचषक जिंकायचा असेल तर संघाने हवेत उडायचे सोडून पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला माजी कर्णधार मायकल वॉन याने दिला आहे. सध्या इंग्लंडचा संघ विंडीजमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे.
विश्वचषक जिंकायचा असेल तर हवेत उडू नका - मायकल वॉन - कर्णधार मायकल वॉन
पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळविला तर दुसऱ्या सामन्यात ३५ धावांत त्याचे ६ गडी माघारी परतले होते. त्यामुळे वॉनने संघावर सडकून टीका केली आहे. दोन्ही संघातील तिसरा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथा सामना २७ फेब्रुवारीला ग्रेनेडा येथे होणार आहे.

वॉन पुढे बोलताना म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघात क्षमता आहे. पण संघाने हवेत उडू नये. प्रत्येक चार-पाच सामन्यात असेच होते. जर हा सामना सेमीफायनलचा असेल तर ते नक्कीच बाहेर जावू शकते.