महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'हा' आहे गेलनंतर सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू

३९ वर्षीय क्लींजरने ग्लूसेस्टरशायर कडून खेळताना ६५ चेंडूत १०२ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे क्लींजरच्या खात्यात आता टी-२० क्रिकेटमध्ये आठ शतके जमा झाली आहेत. २१ वर्षांची क्रिकेट कारकीर्द असणारा मायकल क्लींजर या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे.

By

Published : Aug 31, 2019, 3:18 PM IST

'हा' आहे गेलनंतर सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू

लंडन -ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मायकल क्लींजरने टी-२० ब्लास्ट स्पर्धेत एक मोठा विक्रम रचला आहे. टी-२० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने दुसरे स्थान पटकावले आहे.

मायकल क्लींजर

३९ वर्षीय क्लींजरने ग्लूसेस्टरशायर कडून खेळताना ६५ चेंडूत १०२ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे क्लींजरच्या खात्यात आता टी-२० क्रिकेटमध्ये आठ शतके जमा झाली आहेत. २१ वर्षांची क्रिकेट कारकीर्द असणारा मायकल क्लींजर आता या स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे.

हेही वाचा - रोनाल्डो म्हणतो, 'मला मेस्सीसोबत जेवण करायला आवडेल'

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. क्लींजरनंतर एरॉन फिंच, डेविड वॉर्नर, ल्यूक राइट, ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये सहा शतके आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details