महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने सांगितला आयुष्यातील सर्वात खास क्षण - matthew hayden on special moment

चेन्नईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. "मला 2010 मध्ये दलाई लामा यांना भेटण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातील हा एक अद्भुत क्षण होता. मला खूप खास व्यक्ती भेटली. मला अजूनही आठवत आहे की त्या सामन्यात आम्हाला 190 धावा हव्या होत्या आणि आमच्यावर दबाव होता."

Meeting the Dalai Lama is a special moment in my life said matthew hayden
ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने सांगितला आयुष्यातील सर्वात खास क्षण

By

Published : Apr 13, 2020, 5:32 PM IST

नवी दिल्ली -तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणे हा आयुष्यातील सर्वात खास क्षण असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने म्हटले आहे. 2010 मध्ये धर्मशाळा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हेडनला दलाई लामा यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती.

चेन्नईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. "मला 2010 मध्ये दलाई लामा यांना भेटण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातील हा एक अद्भुत क्षण होता. मला खूप खास व्यक्ती भेटली. मला अजूनही आठवत आहे की त्या सामन्यात आम्हाला 190 धावा हव्या होत्या आणि आमच्यावर दबाव होता."

तो म्हणाला, "यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानावर आला आणि त्याने केवळ 27 चेंडूत 54 धावा केल्या. सुरेश रैनानेही 46 धावांचे योगदान दिले. दोघांनीही 150 च्या सरासरीने धावा फटकावल्या आणि आम्ही अंतिम फेरी गाठली.'

2010च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला 22 धावांनी हरवून चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद जिंकले होते. चेन्नईचे हे पहिले विजेतेपद होते.

ABOUT THE AUTHOR

...view details