हैदराबाद - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दहा फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाज मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या यादीत मयांक विराट आणि अजिंक्यपेक्षा पुढे आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन पहिल्या स्थानावर आहे. लाबुशेनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या १५ डावात ८३.२६ च्या सरासरीने १२४९ धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.