महाराष्ट्र

maharashtra

नाशिकची माया भारत 'अ' संघात; चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी मिळाली संधी

By

Published : Dec 11, 2019, 11:40 AM IST

नाशिकची फिरकीपटू माया सोनवणेची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत अ संघात निवड झाली आहे. मायाने पाँडीचेरी येथे झालेल्या 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिची चैलेंजर्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली.

माया सोनवणे
माया सोनवणे

नाशिक - महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी भारत अ संघात निवड झाली आहे. उत्तम फिरकीपटू असलेल्या मायाने नुकतीच पाँडीचेरी येथे झालेल्या 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.


23 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेत मायाने सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा विक्रम केला. सातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिची चैलेंजर्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान पाँडीचेरी येथे भारत अ, भारत ब , भारत क या संघात सामने होणार आहेत. यातील सर्वोत्तम दोन संघांमध्ये 15 डिसेंबरला टी 20 चॅलेंजर ट्रॉफीचा अंतिम सामना होईल.

हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज

भारत अ संघाचे सामने 11 आणि 13 डिसेंबरला होणार आहेत. माया सोनवणेच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्‍यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी मायाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details