मुंबई - एका शेतकऱ्याचा मुलाने सिक्सर किंग युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. विवा सुपरमार्केट्समध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षाच्या मकरंद पाटीलने ७ चेंडूत ७ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. मकरंदने ८ व्या क्रमाकांवर फलंदाजी करताना हा विवा सुपरमार्केट संघासाठी 26 चेंडूंत 84 धावा चोपल्या आणि महिंद्रा लॉजिस्टीक्स संघाचा पराभव केला. विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ही विक्रमी खेळी केली.
मकरंदच्या या बहारदार खेळीनंतर त्याला शुभेच्छाचे संदेश येत आहेत. या कामगिरीबाबत बोलताना मकरंद म्हणाला, की मी चौथा षटकार खेचलो तेव्हा एका षटकात सहा चेंडू सीमा रेषेपार पाठवेन असे वाटले नव्हते. पण मी जेव्हा सहावा षटकार खेचला तेव्हा सहकारी आनंदाने ओरडू लागले. सातव्या चेंडूवर ठोकलेला षटकार माझ्यासाठी विशेष होता. एका दिवसासाठी स्टार बनून मला खूप छान वाटत आहे.