दुबई - भारतीय संघाने नववर्षांची सुरूवात विजयी मालिकेने केली. श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका भारताने २-० ने जिंकली. या सामन्यात शिखर धवन (५२) आणि लोकेश राहुल (५४) यांच्या अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीनेही सहाव्या क्रमांकावर येत २६ धावांचे योगदान दिले. दरम्यान, या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात विराट एक स्थान वर सरकला आहे, परंतु सध्या विश्रांतीवर असलेल्या रोहित शर्माला मात्र टॉप-१० मधून बाहेर जावे लागले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनूसार, विराट दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर सरकला आहे. रोहित मात्र नवव्या स्थानावरून १३ व्या स्थानी गेला आहे.