महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'यॉर्कर किंग' मलिंगाचा चौकार, सलग चार गडी केले बाद - श्रीलंका आणि न्यूझीलंड टी-20

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा तिसरा टी-20 सामना लंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने गाजवला. सलग चार चेंडूत चार गडी बाद करत मलिंगाने न्यूझीलंडच्या संघाचे तीन-तेरा वाजवले.

'यॉर्कर किंग' मलिंगाचा चौकार

By

Published : Sep 6, 2019, 10:58 PM IST

कोलंबो -श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा तिसरा टी-20 सामना लंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगाने गाजवला. सलग चार चेंडूत चार गडी बाद करत मलिंगाने न्यूझीलंडच्या संघाचे तीन-तेरा वाजवले.

आपल्या आंतरराष्‍ट्रीय कारकिर्दीत मलिंगाने दुसऱ्यांदा सलग चार गडी बाद केले आहेत. यापुर्वी २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग चार चेंडूत चार गडी बाद केले होते. अशी कामगिरी करणारा लसिथ मलिंगा एकमेव गोलंदाज आहे.

न्यूझीलंडच्या तिसऱ्या षटकात कॉलीन मनरो, हमिश रूदरफोर्ड, कॉलिन डी ग्रॅडहोम आणि रॉस टेलर यांना एका पाठोपाठ एक बाद करत तंबूत पाठवले. मलिंगाने चारही खेळाडूंना यॉर्कर टाकून बाद केले. लसिथ मलिंगाच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडचा ३७ धावांनी पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details