लीड्स - विश्वकरंडकात शुक्रवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडवर धक्कादायक विजय मिळवला. श्रीलंकेसाठी अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने इंग्लंडचे ४ फलंदाज माघारी धाडत खळबळ उडवून दिली होती. त्याच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने २० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ४ विकेट घेत मलिंगाने विश्वकरंडकात सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. तसचे विश्वकरंडकात ५० बळी घेणारा तो दुसराच श्रीलंकन गोलंदाज ठरला आहे.
World Cup : विश्वकरंडकात सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत लसिथ मलिंगा चौथ्या स्थानी - Sri Lanka
खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला २३३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा डाव २१२ धावांवर आटोपला.
आतापर्यंत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ याच्या नावावर आहे. तो विश्वकरंडकातील सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने आतापर्यंत ३९ सामन्यांत ७१ बळी घेतले आहेत. मॅक्ग्राथनंतर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ४० सामन्यांत ६८ बळी घेतले. वसीम अक्रमने ३८ सामन्यांत ५५ बळी घेत तिसरे स्थान पटकाविले. तर मलिंगाने २६ सामन्यांमध्ये ५१ बळी घेत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीत चामिंडा वास ४९ बळींसह पाचव्या स्थानी आहे.
खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला २३३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा डाव २१२ धावांवर आटोपला.