डरबन- दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा डाव अचानक गडगडला. आफ्रिकेचे शेवटचे ५ फलंदाज अवघ्या १० धावांच्या अंतरात बाद झाले. आफ्रिकेचा दुसरा डाव २५९ धावांत आटोपला. पहिल्या डावातील ४४ धावांच्या आघाडीच्या बळावर आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ३०४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
RSA VS SL: श्रीलंकेच्या फिरकीपटूची कमाल, १० धावांत आफ्रिकेचे ५ फलंदाज बाद - आफ्रिका
श्रीलंकेकडून लसिथ इम्बुल्डेनिया ५ गडी आणि विश्वा फर्नांडोने ७१ देताना ४ गडी बाद करत चांगली गोलंदाजी केली. श्रीलंकेला अजून २२१ धावांची गरज असून ७ गडी शिल्लक आहेत.
युवा फिरकीपटू लसिथ इम्बुल्डेनियाने चांगली गोलंदाजी करताना अवघ्या ६६ धावांत ५ गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेचा डाव ५ बाद २५० धावांवर सर्वबाद २५९ धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून कर्णधार फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर, क्विंटन डि कॉकने ५५ धावा करत अर्धशतक झळकावले. आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेकडून लसिथ इम्बुल्डेनिया ५ गडी आणि विश्वा फर्नांडोने ७१ देताना ४ गडी बाद करत चांगली गोलंदाजी केली.
आफ्रिकेच्या ३०४ धावांच्या पाठलाग करताना श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ८३ धावा केल्या आहेत. ओशाडा फर्नांडो २८ धावा आणि कुसल परेरा १२ धावा काढून खेळपट्टीवर आहेत. श्रीलंकेला अजून २२१ धावांची गरज असून ७ गडी शिल्लक आहेत.