अबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात अबुधाबी येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरचा खेळाडू आंद्रे रसेलच्या हातून केएल राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्याने स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतले.
केकेआरच्या १६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असता. परंतू घडले वेगळेच. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा झेल टिपण्याचा प्रयत्न करताना आंद्रे रसेलच्या हातून चेंडू सुटला आणि राहुलला जीवदान मिळाले. याशिवाय हा चेंडू अडवताना रसेलला दुखापत झाली. पण, तो चेंडू रसेल अडवू शकला नाही. राहुलला त्या चेंडूवर जीवदानासह चौकार मिळाला. दुसरीकडे झेल सुटला, चौकार गेला आणि रसेल दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, तो गोलंदाजीसाठी येईल की नाही, याबाबतही शंका आहे. लिंकवर क्लिक करून पाहाव्हिडीओ