नवी दिल्ली -हॅट्ट्रिकवीर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव एकदिवसीय क्रिकेटमधील १०० बळी पूर्ण करण्यापासून एक बळी दूर आहे. रविवारी बाराबती स्टेडियमवर रंगणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात २५ वर्षीय कुलदीपला एक विकेट मिळाल्यास तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी मिळविणारा २२ वा भारतीय खेळाडू ठरेल.
हेही वाचा -भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी!
चायनामन कुलदीप यादवने आतापर्यंत ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९९ बळी घेतले आहेत. जर त्याने 100 बळी घेतले तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १०० बळी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. सध्या हा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर असून त्याने ५५ सामन्यात १०० बळी टिपले आहेत.
बुधवारी एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात कुलदीपने हॅट्ट्रिक घेत संघाच्या विजयात हातभार लावला होता. कुलदीपची एकदिवसीय क्रिकेटमधी ही दुसरी हॅट्ट्रिक आहे. यापूर्वी त्याने २१ सप्टेंबर २०१७ रोजी कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.