नवी दिल्ली - फ्रेंचायझीने विंडीजच्या आंद्रे रसेलला आधी संघात घेतले असते तर कोलकाताने आणखी आयपीएल जेतेपदे जिंकली असती, असे मत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने दिले आहे.
‘हा’ खेळाडू संघात असता तर कोलकाताने आणखी जेतेपदे जिंकली असती - गंभीर - gautam gambhir on kkr ipl titles news
गंभीर म्हणाला, “रसेल ५० लाखांच्या बोलीसह कोलकातामध्ये दाखल झाला आणि पवन नेगीला आठ कोटींची बोली लावून दिल्लीत घेतले गेले. माझ्या सात वर्षाच्या काळात रसेल कोलकाता संघात असता तर आम्ही दोन पेक्षा जास्त जेतेपदे पटकावली असती.”

कोलकाता नाईट रायडर्सने दोनवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. ही जेतेपदे कोलकाताने गंभीरच्या नेतृत्वाखाली पटकावली आहेत. २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यानंतर २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला हरवत केकेआरने विजेतेपद पटकावले आहे.