मुंबई - वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याने भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे म्हटले आहे. चंद्रपॉल काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. त्याने रोड सेफ्टी वर्ल्ड मालिकेत भागही घेतला होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर
चंद्रपॉल याने भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे म्हटले आहे. चंद्रपॉल काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. त्याने रोड सेफ्टी वर्ल्ड मालिकेत भागही घेतला होता.
'विराट त्याच्या खेळाच्या सर्व बाबींवर काम करत आहे. त्यामुळे त्याला चांगले परिणामही मिळाले आहेत. शिवाय, तो आपल्या तंदुरुस्ती आणि कौशल्यावर परिश्रम घेत आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना नेहमीच चांगली कामगिरी करायची असते. इतकी वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करणे सोपे नाही', असे चंद्रपॉलने विराटची स्तुती करताना म्हटले.
क्रिकेटविश्वात चंद्रपॉल फलंदाजीच्या विचित्र शैलीसाठीदेखील प्रसिद्ध होता. २२ वर्षे वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या चंद्रपॉलने १९९४ मध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये ५१.३७च्या सरासरीने ११,६८७ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आणि ६६ अर्धशतके जमा आहेत. याशिवाय, चंद्रपॉलने २६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये विंडीजच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांमध्ये त्याने ४१.६०च्या सरासरीने ८,७७८ धावा केल्या.
TAGGED:
Chanderpaul on virat news