कोलकाता -कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कँपची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचे फोटो शेअर केले आहेत.
कोलकाताने हे फोटो शेअर करताना त्याला, क्वारंटाइन टाईम. या हंगामासाठी खेळाडू तयार आहेत. कँपची सुरूवात होणार आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर या हंगामात कोलकाताचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. उभय संघातील हा सामना चेन्नईत खेळला जाईल.