अबुधाबी -आयपीएलचा ४२वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ बाद १९४ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणाने ८१ धावांची अर्धशतकी खेळी करत सर्वांची मने जिंकली. अर्धशतकानंतर नितीशने सुरींदर नावाची जर्सी मैदानावर झळकावून आकाशाकडे हात जोडले.
अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण - नितीश राणाचे सासरे न्यूज
नितीशने हे अर्धशतक आपल्या सासऱ्यांना म्हणजेच सुरींदर यांना समर्पित केले. नितीशच्या सासऱ्यांचे शुक्रवारी निधन झाले. नितीशने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि एक षटकार ठोकला.
अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण
नितीशने हे अर्धशतक आपल्या सासऱ्यांना म्हणजेच सुरींदर यांना समर्पित केले. नितीशच्या सासऱ्यांचे शुक्रवारी निधन झाले. नितीशने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि एक षटकार ठोकला. नितीशने सुनिल नरिनसोबत (६४) चौथ्या गड्यासाठी ५६ चेंडूत ११५ धावा केल्या. कोलकाताची अवस्था ४२ वर तीन गडी बाद अशी असताना राणा-नरिन जोडीने डाव सावरत दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.