महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून अश्विनला नारळ मिळण्याची शक्यता - रविचंद्रन अश्विन

विंडीजसोबतच्या पहिल्या कसोटीत स्थान न मिळू शकलेल्या अश्विनला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या अनुसार, आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून अश्विनला डच्चू मिळणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. सध्या पंजाब संघाचे कर्णधारपद अश्विनकडे आहे. आयपीलच्या मागील दोन हंगामात पंजाबची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे, येणाऱ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स किंवा राजस्थान रॉयल्स या दोन संघापैकी एका संघात अश्विनला स्थान मिळू शकते.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून अश्विनला नारळ मिळण्याची शक्यता

By

Published : Aug 25, 2019, 8:59 AM IST

नवी दिल्ली -टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलेले नाही. अश्विनचा समावेश न केल्याने सुनिल गावस्कर यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे कसोटीतील अश्विनची कारकीर्द धोक्यात आहे असे म्हटले जात आहे.

यादरम्यान, विंडीजसोबतच्या पहिल्या कसोटीत स्थान न मिळू शकलेल्या अश्विनला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या अनुसार, आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून अश्विनला डच्चू मिळणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. सध्या पंजाब संघाचे कर्णधारपद अश्विनकडे आहे. आयपीलच्या मागील दोन हंगामात पंजाबची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे, येणाऱ्या हंगामात, दिल्ली कॅपिटल्स किंवा राजस्थान रॉयल्स या दोन संघापैकी एका संघात अश्विनला स्थान मिळू शकते.

रविचंद्रन अश्विनने पंजाबकडून २८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५ बळी घेतले आहेत. सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अश्विनला स्थान न मिळाल्याने भारताचे माजी फलंदाज सुनिल गावस्कर यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. गावस्कर म्हणाले, 'वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. कारण, त्यात अश्विनचा समावेश केला नाही. विंडीजविरुद्ध अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहिलेला आहे.'

अश्विनने वेस्ट इंडीजविरुद्ध ११ कसोटी सामन्यांमध्ये ५५२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ६० बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details