मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटविश्वात धडाकेबाज फलंदाज म्हणून परिचित असलेला महेंद्रसिंह धोनी आज ३९ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केदार जाधवनेही त्याला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या विशेष दिवसानिमित्त केदारने धोनीला एक भावनिक पत्र लिहिले आहे.
#HBD माही : केदार जाधवचे धोनीला भावनिक पत्र - ms dhoni latest news
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केदार जाधवने धोनीला एक भावनिक पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या पत्रात केदारने धोनीसंबंधित आपल्या भावना शेअर केल्या आहेत. कोरोनामुळे साजरा न करता येऊ शकणारा हा वाढदिवस, मोठ्या भावाप्रमाणेे खंबीर उभा राहणारा व्यक्ती, एक चाहता म्हणून धोनीबद्दल वाटणारे प्रेम, देशासाठी धोनीने दिलेले योगदान, युवा गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा धोनी, शेवटपर्यंत लढण्यासाठी संदेश देणारा धोनी आणि त्याच्या पुनरागमनाविषयी आग्रह अशा गोष्टींचा केदारने या पत्रात उल्लेख केला आहे. या पत्राच्या शेवटी केदारने 'अभी ना जाओ छोडकर' हे गाणेही धोनीला समर्पित केले आहे. वाचा केदारने लिहिलेले हे पत्र -
39 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. 2005 ते 2014 या कालावधीत धोनीने 90 कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्याने 4876 धावा ठोकल्या. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे.