नवी दिल्ली - युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या पहिल्या विश्वकरंडक विजयी संघाचे नेतृत्व करणारे कपिल देव यांनीही युवराजला शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराजसारख्या दिग्गज खेळाडूला मैदानावर निरोप मिळायला हवा होता - कपिल देव
कपिल देव म्हणाले की, 'मी जेव्हा माझा ऑलटाइम 11 वनडे संघ बनवेन, त्यात मी युवराजला नक्की स्थान देईन
कपिल देव म्हणाले की, 'मी जेव्हा माझा ऑलटाइम 11 एकदिवसीय संघ बनवेन, त्यात मी युवराजला नक्की स्थान देईन. ते पुढे म्हणाले की, युवराजसारख्या दिग्गज खेळाडूला मैदानावर निरोप मिळायला हवा होता. त्याने आजवर भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंमुळे आपल्या येणाऱ्या नव्या पिढीसमोर एक चांगला आदर्श निर्माण होऊ शकतो.'
युवराजने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने ३ ऑक्टोबर २००३ साली एकदिवसीय सामन्यामधून भारताच्या संघात पदार्पण केले होते. युवीने भारताकडून ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.