महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कपिल देव यांनी दिला सीएसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - kapil dev cac news

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करणाऱ्या सल्लागार समितीला (CAC) बीसीसीआयकडून नोटीस बजावण्यात आली. बीसीसीआयच्या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही.त्यामुळे, बीसीसीआय लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना नोटीस बजावली होती. शिवाय, या तीन सदस्यांवरील आरोपाबाबत १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.

कपिल देव यांनी दिला सीएसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

By

Published : Oct 2, 2019, 12:52 PM IST

मुंबई - क्रिकेट सल्लागार समितीतील (CAC) सदस्या शांता रंगास्वामी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, कपिल देव यांनीही आपले पद सोडले आहे. परस्पर हितसंबंधाची नोटीस पाठवल्यानंतर कपिल देव यांनी सीएसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

क्रिकेट सल्लागार समिती

हेही वाचा -विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप : भालाफेकपटू अनु राणीला मिळाले आठवे स्थान

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करणाऱ्या सल्लागार समितीला (CAC) बीसीसीआयकडून नोटीस बजावण्यात आली. बीसीसीआयच्या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही.त्यामुळे, बीसीसीआय लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना नोटीस बजावली होती. शिवाय, या तीन सदस्यांवरील आरोपाबाबत १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते.

परंतू या तारखेअगोरदरच, सीएसीतील दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयने एक ३ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्षस्थान भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे सोपवण्यात आले होते. तर त्यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची निवड सदस्य म्हणून करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details