महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी वागणूक, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मागितली माफी - Jofra Archer latest news

आर्चरने ट्विटरद्वारे या घटनेचा उल्लेख केला. 'वर्णद्वेषी वागणूकीतून मला थोडा त्रास झाला. हा प्रकार सोडला तर प्रेक्षकांचा पाठिंबा चांगला होता', असे आर्चरने ट्विटमध्ये म्हटले आहे. इंग्लंडच्या डावात २४ वर्षीय फलंदाज आर्चर आणि सॅम करन धावा घेत असताना ही घटना घडली. ' मैदानात सुरक्षा कर्मचारी असूनही आम्ही दोषींना शोधू शकलो नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज शोधू आणि मग त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी उद्या चौकशी सुरू करू', असे  एनजेडसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी वागणूक, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मागितली माफी

By

Published : Nov 25, 2019, 6:18 PM IST

नवी दिल्ली - इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने एक डाव आणि ६५ धावांनी दमदार विजय नोंदवला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांनी वर्णद्वेषाचे भाष्य केले असल्याचा दावा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केला. या घटनेबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने(एनजेडसी) आर्चरची माफी मागितली आहे.

हेही वाचा -वॉर्नरचे 'स्पेशल शूज' पाहिलेत का?..जाणून घ्या या शूजचे रहस्य

आर्चरने ट्विटरद्वारे या घटनेचा उल्लेख केला. 'वर्णद्वेषी वागणूकीतून मला थोडा त्रास झाला. हा प्रकार सोडला तर प्रेक्षकांचा पाठिंबा चांगला होता', असे आर्चरने ट्विटमध्ये म्हटले आहे. इंग्लंडच्या डावात २४ वर्षीय फलंदाज आर्चर आणि सॅम करन धावा घेत असताना ही घटना घडली. ' मैदानात सुरक्षा कर्मचारी असूनही आम्ही दोषींना शोधू शकलो नाही. आम्ही सीसीटीव्ही फुटेज शोधू आणि मग त्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी उद्या चौकशी सुरू करू', असे एनजेडसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बे ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला एक डाव आणि ६५ धावांनी हरवून दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात आर्चरने ३० धावा केल्या. शुक्रवारी दोन्ही संघ हॅमिल्टनमध्ये दुसरी आणि शेवटची कसोटी खेळणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details