गोवा -भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. बुमराहने लग्नाच्या कारणास्तव ही सुट्टी घेतल्याचे नंतर समोर आले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध क्रीडा सादरकर्ती संजना गणेशनसोबत बुमराह विवाहबंधनात अडकणार आहे.
१४ ते १५ मार्चला हा विवाहसोहळा गोव्यात होणार आहे. बुमराहच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. बुमराहची पत्नी कोण असणार, यावरून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र, सूत्रांच्या मते गोव्यात बुमराह बोहल्यावर चढणार आहे.
संजना गणेशन ही मिस इंडिया स्पर्धेची सदस्य राहिली आहे. तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. संजनाने आयपीएल सामन्यांमध्येही काम केले आहे. भारतातील इतर अनेक सामनेदेखील तिने कव्हर केले आहेत. यादरम्यान दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल दरम्यान तिने 'केकेआर डायरी' देखील आयोजित केली होती.