मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहिती नुसार, बुमराहच्या खांद्याचे स्कॅन करण्यात आले असून त्याला कोणताही प्रकारचा त्रास नाही.
बुमराहच्या खांद्याचे स्कॅन, असा आहे रिपोर्ट - jasprit bumrah
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना २८ मार्च रोजी रॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे.
रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती, तेव्हा बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटप्रेमी यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या बंगळुरूकडे रवाना झाला आहे. बुमराहचे रिपोर्ट उशीरा आल्याने त्याला एकट्याला प्रवास करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना २८ मार्च रोजी रॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे.