महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बुमराहचे भारतात कसोटी पर्दापण, श्रीनाथला टाकले मागे - जसप्रीत बुमराह लेटेस्ट न्यूज

विदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळून मायदेशात पहिला सामना खेळण्याचा विक्रमात बुमराहने जवागल श्रीनाथला मागे टाकले आहे.

jasprit Bumrah
jasprit Bumrah

By

Published : Feb 5, 2021, 12:16 PM IST

चेन्नई -भारत आणि इंग्लंड यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा हा १८ वा कसोटी सामना आहे. मात्र, यापूर्वीचे १७ सामने त्याने भारताबाहेर खेळले असल्याने त्याचा हा भारतातील पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे विदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळून मायदेशात पहिला सामना खेळण्याचा विक्रमात त्याने जवागल श्रीनाथला मागे टाकले.

हेही वाचा - भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

यापूर्वी माजी जलदगती गोलंदाज श्रीनाथने पदार्पणापासून विदेशात १२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याला भारतात खेळण्याची संधी मिळाली. या क्रमवारीत रुद्र प्रताप सिंग (११), सचिन तेंडुलकर (१०) आणि आशिष नेहरा (१०) यांचा समावेश आहे.

५ जानेवारी २०१८ रोजी बुमराहने न्यूझीलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पदार्पण केले. गेल्या महिन्यात तो ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍याचा भाग होता. दुखापतीमुळे ब्रिस्बेन कसोटीत तो खेळू शकला नाही. बुमराहने आतापर्यंत १७ कसोटी सामन्यांमध्ये २१.५९ च्या सरासरीने एकूण ७९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाच वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. २७ धावांत ६ बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details