महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रिकेटमध्ये घडला इतिहास, पुरुषांच्या सामन्यात महिला करणार 'पंचगिरी' - पहिली महिला थर्ड अंपायर न्यूज

पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात जॅकलिन या पहिल्या महिला थर्ड अंपायर (तिसरे पंच) म्हणून काम पाहणार आहेत. विंडीज आणि आयर्लंडमध्ये रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात जॅकलिन तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील.

jacqueline williams set to become 1st woman third umpire in men's international cricket
क्रिकेटमध्ये घडला इतिहास, पुरूषांच्या सामन्यात महिला करणार 'पंचगिरी'

By

Published : Jan 15, 2020, 5:34 PM IST

दुबई -वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट पंच जॅकलिन विल्यम्स क्रिकेटविश्वात इतिहास घडवण्यास सज्ज झाल्या आहेत. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात जॅकलिन या पहिल्या महिला थर्ड अंपायर (तिसरे पंच) म्हणून काम पाहणार आहेत.

जॅकलिन विल्यम्स

हेही वाचा -विराटकडे आयसीसीच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व

विंडीज आणि आयर्लंडमध्ये रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात जॅकलिन तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील. या संघांमध्ये तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार असून या मालिकेची सुरूवात आज बुधवारपासून होणार आहे.

'हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे आणि पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मी ही टीव्ही पंचांची भूमिका साकारण्यास पूर्णपणे तयार आहे. पुरुषांच्या स्थानिक सामन्यातही मी पंच म्हणून काम केले आहे, मात्र, आता पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मी प्रथमच पंच म्हणून काम करेन. बऱ्याच वर्षांपासून सहकार्य केल्याबद्दल मी आयसीसीची आभारी आहे. आगामी काळात अधिक महिला पंच पुढे आल्या पाहिजेत', असे जॅकलिन यांनी निवड झाल्यानंतर म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details