महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Breaking News : अष्टपैलू इरफान पठाणची अखेर निवृत्ती

भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पंधरा वर्षाच्या कारकिर्दीनंतर पठाणने निवृत्ती स्वीकारली.

Breaking News : अष्टपैलू इरफान पठाणची अखेर निवृत्ती
Breaking News : अष्टपैलू इरफान पठाणची अखेर निवृत्ती

By

Published : Jan 4, 2020, 5:50 PM IST

Updated : Jan 4, 2020, 7:06 PM IST

नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पंधरा वर्षाच्या कारकिर्दीनंतर पठाणने निवृत्ती स्वीकारली. मात्र, तो लीग क्रिकेट खेळणार आहे.

निवृत्तीच्या वेळी इरफान पठाणने सांगितले, की मी गेल्या काही महिन्यापासून डोमेस्टिक क्रिकेट खेळत होतो. बराच वेळ मी जम्मू-काश्मीर संघाचा भाग राहिलो. पण नंतर मला असे जाणवले की माझ्या जागी आता नवीन खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. माझ्य़ासाठी इतर बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या मी आता त्याच्याकडे लक्ष देईन.'

इरफान पठाण हा भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित आहे. त्याने पठाणने भारताकडून २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. इरफान कसोटीमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा इरफान हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. त्याने कराची येथे 2006 मध्ये पाकिस्तान विरुद्ध ती हॅट्ट्रिक घेतली होती.

हेही वाचा -हिटमॅनच्या गैरहजेरीचा विराट घेणार फायदा, बळकावणार पहिले स्थान

हेही वाचा -'ज्याच्यामुळं संधी मिळाली, त्यालाच पछाडलं', लाबुशानेनं मोडला स्मिथचा विक्रम

Last Updated : Jan 4, 2020, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details