मुंबई- आयपीएलचा आगामी हंगाम २३ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा फिव्हर पूर्ण देशात चढला आहे. साउथर्न डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱया चेन्नई-बंगळुरू सामन्याने आयपीएलची सुरूवात होत आहे. यानिमित्ताने आयपीएलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात धोनी-कोहली एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.
IPL 2019 : विराट-धोनीच्या लढाईला २३ मार्चपासून सुरूवात; एकमेकांना दिले आव्हान - धोनी
साउथर्न डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱया चेन्नई-बंगळुरू सामन्याने आयपीएलची सुरूवात होत आहे. यानिमित्ताने आयपीएलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात धोनी-कोहली एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना दाखवण्यात आले आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत दोन्ही संघांचे चाहते कोहली..कोहली...आणि धोनी..धोनी...चा गजर करत आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव घेत आहेत.
व्हिडिओच्या शेवटी कोहली धोनीला म्हणतो, काय वाटत आहे? उत्तर देताना धोनी म्हणतो, धोनी आणि कोहली फक्त नाव आहे. यावर कोहली म्हणतो, चला तर खेळ दाखवूयात. यानंतर धोनी सामन्याच्या तारखेची आठवण करून देत उशीर करू नकोस. यावर कोहली म्हणतो बिल्कूल.