महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनी की रोहित....आयपीएलच्या महासंग्रमात आज कोण मारणार बाजी - Mumbai Indians

भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत

CSK vs MI

By

Published : Apr 3, 2019, 1:36 PM IST

मुंबई - इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या सत्रातील पहिले तिन्ही सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना आज मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या सामन्यानिमित्त भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघानी आजवर ३ वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे.

मुंबई इंडियन्ससमोर आज चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान


मुंबई इंडियन्स हा चौथा सामना असणार आहे. यापूर्वी झालेल्या ३ सामन्यापैकी २ सामन्यात मुंबईला पराभव तर १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. हा सामना आज रात्री ८ वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.


मुंबईची फलंदाजीची धुरा ही प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मासह, क्विंटन डीकॉक, एव्हिन लुईस, हार्दिक पंडय़ा आणि युवराज सिंग यांच्यावर राहिल. तर चेन्नईची जबाबदारी ही एम एस धोनी, सुरेश रैना, आंबती रायडू, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन यांच्यावर असणार आहे.


मुंबईच्या गोलंदाजीचीकमान जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे आणि मिचेल मॅक्क्लिनॅघनवर असेल तर चेन्नईची जबाबदारी प्रामुख्याने रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, ईम्रान ताहीर याच्यांवर असणार आहे.


चेन्नई सुपर किंग्ज -एम.एस. धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.


मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ऍडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम, युवराज सिंग, जयंत यादव.

ABOUT THE AUTHOR

...view details