चेन्नई - आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आरसीबीच्या खेळाडूंनी सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसह काही सदस्यांनी फोटोशूटमध्ये भाग घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे पाहायला मिळत आहेत. फोटोशूट दरम्यान, तिघांनी एकत्र डान्स करत धम्माल केली. यावेळी तिघांनी ही आरसीबीची नवी जर्सी परिधान केलेली होती.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. उद्या (शुक्रवार) हे दोनही संघ चेन्नईमध्ये एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत.