महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२१ : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! रोहितने आयपीएलपूर्वीच दाखवला फटकेबाजीचा ट्रेलर - mumbai indians NEWS

मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईमध्ये असून मुंबईचे खेळाडू सराव सत्रात घाम गाळताना पाहायला मिळाले. यात रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. तो आयपीएलमध्ये तळपण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

ipl 2021 mumbai indians captain rohit sharma hitting big shot in practice at chennai video viral
IPL २०२१ : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! रोहितने आयपीएलपूर्वीच दाखवला फटकेबाजीचा ट्रेलर

By

Published : Apr 8, 2021, 1:10 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ काही तासात एकमेकांसमोर उभे ठाकतील. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत विक्रमी पाचवेळा जेतेपद पटकावलेले आहे. ते यावर्षीचे विजेतेपद पटकावून विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईमध्ये असून मुंबईचे खेळाडू सराव सत्रात घाम गाळताना पाहायला मिळाले. यात रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. तो आयपीएलमध्ये तळपण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाबरोबर उद्या (शुक्रवार) चेन्नईमध्ये होणार आहे.

असा आहे मुंबईचा मुंबई इंडियन्सचा स्वॉड -

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, ख्रिस लिन, मोहसिन खान, अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन आणि अर्जुन तेंडुलकर.

हेही वाचा -IPL २०२१ : उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश; विराट, डिव्हिलियर्सने दिली भन्नाट प्रतिक्रिया

हेही वाचा -IPL २०२१ : धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफ फेरी गाठू शकणार नाही; गंभीरचे भाकित

ABOUT THE AUTHOR

...view details