मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला प्रत्येक संघांनी सुरूवात केली आहे. काही तासांपूर्वीच संघांनी कायम राखलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानंतर आता ट्रेडिंग विंडोच्या माध्यमातून सहमतीने खेळाडूंची अदलाबदल केली जात आहे. यात दिल्लीच्या दोन अष्टपैलू खेळाडूंना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात घेतले आहे.
बंगळुरूने दिल्लीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेल आणि डॅनिअल सॅम्स यांना आपल्या संघात घेतले आहे. दिल्ली आणि बंगळुरूने आपल्या अधिकृत ट्विटवरुन याची माहिती दिली आहे.
काय आहे ट्रेडिंग विंडो -
ट्रेडिंग विंडोमध्ये दोन संघ आपापसात चर्चा करुन खेळाडूंची देवाणघेवाण अथा विकत घेऊ शकतात. आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी ४ फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो सुरु राहणार आहे.
दरम्यान, हर्षल पटेलने आयपीएल ४८ सामने खेळली आहेत. यात त्याने ४६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीदेखील आपली कमाल दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅनिअल सॅम्सच्या नावे ५१ टी-२० सामन्यात ६३ बळी आहेत. तसेच तो फटकेबाजी करण्यात पटाईत आहे.
हेही वाचा -ठरलं तर..! आयपीएलच्या नव्या पर्वासाठी 'या' तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव
हेही वाचा -''आता आयपीएल पूर्वीसारखे असणार नाही'', बुमराहच्या मलिंगाला शुभेच्छा