नवी दिल्ली -आगामी आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने जोर दिला आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ''आगामी आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. स्पर्धेच्या जागेबाबत निर्णय घेणे अद्याप बाकी आहे.'' कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात आला. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी मालिका यशस्वीपणे आयोजित केली गेली तर, आयपीएल स्पर्धा भारतात होण्याचा मार्ग मोकळा होईल.