महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : चहलला मिळाला सामनावीर पुरस्कार; होणाऱ्या पत्नीला अत्यानंद, पाहा व्हिडिओ - आयसीबी

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. चहलच्या या कामगिरीवर त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिने पोस्ट लिहली असून तिची ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

ipl 2020 yuzvendra chahal becomes man of the match fiance dhanashree verma reaction on unique style
IPL २०२० : चहलला मिळाला सामनावीरचा पुरस्कार; होणाऱ्या पत्नीला झाला अत्यानंद, पाहा व्हिडीओ

By

Published : Sep 22, 2020, 5:43 PM IST

दुबई - सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी गडी बाद करत सामना आरसीबीच्या पारड्यात घातला. त्याने मैदानात स्थिरावलेल्या जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला एका षटकात बाद केले. तीन गडी टिपणाऱ्या चहलला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. चहलच्या या कामगिरीवर त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिने पोस्ट लिहली असून तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धनश्रीने काय लिहिलं आहे पोस्टमध्ये -

'हा आपला पहिलाच एकत्रितरित्या सामना आहे. हा खेळ आहे आणि यात काही होऊ शकते. कारण विजयासाठी प्रत्येक जण अथक परिश्रम घेतो. मात्र, आजच्या सामन्यातील (चहल सामनावीर पुरस्कारचा घेतानाचा क्षण) हा माझ्यासाठी खास क्षण आहे. तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि खूप सारं प्रेम.'

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकर यांना माघारी धाडत सामन्याचे पारडे आरसीबीच्या दिशेने झुकवले. त्यानंतर प्रियम गर्गही आल्या पावले माघारी परतला. तेव्हा राशिद खान आणि अभिषेक शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राशिदने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अभिषेक शर्मालाही सूर गवसला होता.

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने एक फटका खेळला. यावेळी दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या राशिद खानने एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी परत येत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ दिसला नाही. धाव पूर्ण करण्याच्या नादात दोन्ही फलंदाजांची जोरात टक्कर झाली. त्यावेळी चेंडू उमेश यादवच्या हातात होता. त्याने त्वरित यष्टीरक्षक जोश फिलिपकडे फेकला आणि अभिषेकला सहज धावबाद केले. या एका अपघाताचा फटका हैदराबादलाच बसला आणि अखेर आरसीबीने हा सामना १० धावांनी जिंकला.

युजवेंद्रने कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी 8 ऑगस्टला साखरपुडा केला आहे. ते दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details